Eknath Shinde: करवाढ, दरवाढ मुक्त मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प! एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde: करवाढ, दरवाढ मुक्त मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प! एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिकेचा ७४४२७.४१ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर; करवाढ, दरवाढ मुक्त असल्याने मुंबईकरांना दिलासा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.
Published by :
Prachi Nate
Published on

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा ७४४२७.४१ कोटींचा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी यांनी पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर केला आहे, तर प्रशासकीय राजवटीतील तिसरा अर्थसंकल्प आहे. याचपार्श्वभूमिवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“कुठलीही करवाढ नाही, शुल्कवाढ नाही, भुर्दंडवाढ नाही असा हा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर झाला.... तब्बल 74 हजार 427 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मुंबईकरांना दिलासा देणारा आहे. हा अर्थसंकल्प ९२४६.६२ कोटींनी जास्त असून आगामी अर्थसंकल्प १४.१९ टक्क्यांनी अधिक आहे. याचा अर्थ मुंबई वेगाने कात टाकत आहे तसेच वेगाने काम करत आहे. मला आजही आठवतय, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी आणि देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांचा खड्डेमुक्त प्रवास बंद करण्याच्या निर्णय घेतला.. आणि आम्ही दोन टप्प्यात मुंबईच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केले... जनतेचा पैसा कोणाच्या खिशात आणि घशात गेला हे सगळ्यांना माहित आहे, सिमेंट आणि काँक्रिटीच काम सुरू आहे.. खड्डेमुक्त मुंबई होईल पण भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न केला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच, अर्थसंकल्पात 43 हजार कोटी विकासकामांवर खर्च होणार आहे. त्यावरून मुंबईचा विकास राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने किती गांभीर्याने घेतला आहे, हे दिसून येते. भांडवली खर्चातली ही वाढ विक्रमी आहे... बेस्टसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावरही भर देण्यात आलेला आहे. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हा दिलेला शब्द खरा करून दाखवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात ग्लोबल मुंबई ही देशाचे फिनटेक कॅपिटल म्हणून आकाराला येत आहे. जगाच्या नकाशावर मुंबई दिमाखाने तळपताना दिसेल... मुंबई वाहतूक कोंडी दूर, हरित कवर वाढले पाहिजे.. १ हजार पेक्षा जास्त उद्याने आहे.. गार्डन सिटी म्हणून ओळख होऊ शकते, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com